सुप्रसिद्ध बाल साहित्यिक प्रीती वडनेरकर यांच्या प्रमुख उपस्थित उपस्थितीत दि साऊथ पब्लिक स्कूल, ओंकार नगर, नागपूर येथे मराठी दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी श्री. शी. द. फडणीस या हास्यचित्रकारांना शुभचिंतन देणाऱ्या हसरी गॅलरी या हास्य चित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांनीच तयार केलेल्या वेध या आठव्या वार्षिक हस्तलिखित अंकाचे मा. प्रीती वडनेरकर यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.
इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला. इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी विविध बालगीतांवर आकर्षक नृत्य सादर केली. मी मराठी या मराठी गीतावर सादर झालेले नृत्य कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. अदिती शिंदे इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनीने पु ल देशपांडे लिखित ती फुलराणी नाटकातील स्वगत दमदारपणे सादर करून उपस्थिताची वहावा मिळवली. सर्वोत्कृष्ट वेध लेखक पुरस्कार इयत्ता दहावीतील वेद नासरे या विद्यार्थ्याला मिळाला तर सर्वोत्कृष्ट सहभागीता पुरस्कारासाठी इयत्ता आठवीतील धैर्य सोनकुसरे याची निवड करण्यात आली.
शाळेच्या प्राचार्या डॉक्टर मृणालिनी दस्तुरे तसेच संचालक श्री देवेन दस्तुरे यांनी ही विद्यार्थ्यांना मराठी वाचन, लेखन तसेच यथायोग्य उच्चारणाचे महत्त्व यावेळी पटवून दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वच शिक्षक व विद्यार्थ्यांचे शाळेचे उपप्राचार्य श्री मंगेश चीनेवार, पर्यवेक्षिका मनीषा साळुंखे, जयश्री देशमुख, मीनल तांडय्या, चेरी ब्लॉसम शिशु वाटिका प्रमुख संगीता सिंग, उपप्रमुख अंजली देशपांडे , इंग्लिश विभाग प्रमुख अनुपमा डिसूजा यांनी अभिनंदन केले आहे.